मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

भारताचा चालू वर्षाचा जिडीपी वृद्धी दर ६.६% - IMF १८ जानेवारी २०१७

भारताचा चालू वर्षाचा जिडीपी वृद्धी दर ६.६% - IMF १८ जानेवारी २०१७

* आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर ६.६% केला आहे. आधी हा अंदाज ७.६% होता. नोटबंदीच्या निर्णयाचा फटका बसल्याने भारताचा वृद्धी दर खाली येणार आहे.

* नाणेनिधीने म्हटले आहे की नाणेनिधीने २०१६-१७ या वर्षासाठी चीनचा जीडीपी वृद्धीचा अंदाज मात्र वाढवून ६.७% केला आहे. आधी तो ६.५% होता.

* २०१७-१८ मध्ये भारताचा जिडीपी वृद्धी दर सुरळीत होऊन ७.२% होईल. असे नाणेनिधीने म्हटले आहे. २०१८-१९ मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर ७.७% एवढ्यावर जाईल.

* परंतु संयुक्त राष्ट्राच्या मते भारताचा वृद्धिदर ७.७% राहील. असा अंदाज आहे तसेच भारत यंदा सर्वात वेगाने प्रगती करणारा विकसनशील देश असेल असेही अहवालात म्हटले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.