शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

वस्तू व सेवा कर GST चे फायदे व महत्वाचे मुद्दे - २८ जानेवारी २०१७

वस्तू व सेवा कर GST चे फायदे व महत्वाचे मुद्दे - २८ जानेवारी २०१७

* सोप्या कर व्यवस्थेने कराचे अनुपालन जास्त सोपे होईल. व्यापार व उद्योगांना होणारे लाभ स्पष्ट होतील. यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळेल.

* अर्थव्यवस्थेसाठी लाभप्रद - एकीकृत सामान्य राष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती करण्यासाठी, मेक इन इंडिया अभियान आणि भारताला एक मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, गुंतवणुक व निर्यातीला चालना, आर्थिक गतिविधींमध्ये वृद्धीमुळे नवीन रोजगाराचे सृजन.

* व्यापार व उद्योगासाठी लाभ - पंजीकरण, शुल्क भरणा, रिटर्न फाईल करणे व कराचे रिफंड प्राप्त करण्यासाठी समान प्रक्रिया, छोट्या पुरवठादरांच्या एका मोठ्या वर्गाला सूट/कम्पाउंडिंग योजनांच्या लाभामुळे या वर्गाची उत्पादने स्वस्त होतील, करावर कराच्या निर्मूलनामुळे निर्माता व पुरवठादार ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत टॅक्स क्रेडिटच्या अनिर्बंध प्रवाह, निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त प्रतिस्पर्धक बनविण्यासाठी करांचे उत्तम निष्प्र भाविकरण.

* सोपे कर अनुपालन - कमी सूट सोबत सरल कर व्यवस्था, देशभरात नियम, प्रक्रिया व कर दरात एकरूपता, वस्तू व सेवा यावर लागणाऱ्या वर्तमान अनेक करांच्या जागी एक कर यामुळे सुगमता.

* सरल कर व्यव्यस्था - सूचना व तंत्रज्ञानाच्या उत्तम वापरामुळे करदाता व कर व्यवस्थापन यांच्या दरम्यान मानवीय हस्तक्षेपाची गरज कमी होईल. पंजीकरण रिटर्न दाखल करणे, कर भरणा, रिफंड व क्रेडिट सत्याकंन यासाठी स्वयंचलित प्रक्रिया, अनेक करासाठी विभिन्न प्रकारचे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसल्याने कारभार करणे सोपे होईल, खूप करांच्या जागी एका अखिल भारतीय करामुळे अनुपालनाचे ओझे कमी होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.