बुधवार, ४ जानेवारी, २०१७

पाच राज्यातील निवडणूक तारखा जाहीर - ५ जानेवारी २०१७

पाच राज्यातील निवडणूक तारखा जाहीर - ५ जानेवारी २०१७

* राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान पाचही राज्यातील निवडणूक कार्यक्रम चालेल.

* उत्तरप्रदेश - या राज्यात ७ टप्प्यात ४०३ विधानसभा मतदारसंघ मतदान ११, १५, १९, २३, २७, फेब्रुवारी आणि ४ आणि ८ मार्चला मतदान होणार असून ११ मार्चला निकाल जाहीर केला जाईल.

* गोवा राज्यात ४० विधानसभा जागेसाठी ४ फेब्रुवारीला मतदान आणि ११ मार्चला निकाल लागेल.

* पंजाब विधानसभा निवडणूक ११७ जागेसाठी ४ फेब्रुवारीला मतदान आणि ११ मार्चला निकाल लागेल.

* उत्तराखंड विधानसभा निवडणूक ७१ जागेसाठी १५ फेब्रुवारीला मतदान आणि ११ मार्चला निकाल लागेल.

* मणिपूर विधानसभा निवडणूक ६० जागेसाठी ४ आणि ८ मार्चला मतदान व ११ मार्चला निकाल लागेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.