सोमवार, ३० जानेवारी, २०१७

ईरीस मित्तेंनेर २०१६ ची मिस युनिव्हर्स किताबाची विजेती - ३१ जानेवारी २०१७

ईरीस मित्तेंनेर २०१६ ची मिस युनिव्हर्स किताबाची विजेती - ३१ जानेवारी २०१७

* सौन्दर्य आणि प्रतिभेच्या जोरावर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्टेच्या मानल्या जाणाऱ्या ' मिस युनिव्हर्स ' किताबाची यावर्षीची मानकरी ठरली आहे फ्रेंच सौन्दर्यवती ईरीस मित्तेंनेर.

* मिस युनिव्हर्स बनलेल्या २४ वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरीस मित्तेंनेर हिने इतर ८५ स्पर्धक युवतीवर मात करीत हा किताब पटकाविला आहे. उपविजेतेपद २५ वर्षीय मिस हैती रेक्वेल पोलीसिरला मिळाले. तर २३ वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर हि तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

* फ्रान्सला तब्बल ४४ वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्ट्सबाख हिच्या रूपाने फिलिपाईन्सला ४० वर्षांनी मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला होता.

* मिस युनिव्हर्स हा किताब १९५२ मध्ये सुरु झाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी १९५३ साली फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियन मार्टेल 'किताब पटकावला होता. त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.