शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

डॉ विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती - २८ जानेवारी २०१७

डॉ विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती - २८ जानेवारी २०१७

* प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढील तीन वर्षासाठी हि नियुक्ती केली आहे. २५ जानेवारी २०१७ पासून डॉ भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असतील.

* डॉ भटकर पदमश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. डॉ भटकर यांनी आयआयटी दिल्लीत आपलं शिक्षण पूर्ण केलं होत.

[ विजय भटकरांचा परिचय ]

* डॉ विजय भटकर यांना आयटी लीडर म्हणून ओळखलं जात. भारताचा पहिलावहिला सुपर कंप्युटरचे डिझाईन भटकरांनी बनवलं आहे.

* डॉ भटकर हे C-DAC चे संस्थापक संचालक राहिले आहेत.

* त्यांनी C-DAC, ER&DC, IITM-K, I2IT, ETH Research Lab, MKCL आणि India International Multiversity यामध्ये भरपूर योगदान दिले आहेत.

* केंद्र सरकाराच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे डॉ भटकर सदस्य राहिले आहेत.

* महाराष्ट्र सरकारच्या व गोवा सरकाराच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या डॉ भटकरांनी भरीव योगदान दिल आहे.

* डॉ भटकरांना पदमश्री, महाराष्ट्र भूषण, संत ज्ञानेश्वर विश्व शांती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.