गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

मानवी शरीराच्या अवयवांची संख्या ७९ नवीन अवयवाचा शोध - ५ जानेवारी २०१७

मानवी शरीराच्या अवयवांची संख्या ७९ नवीन अवयवाचा शोध - ५ जानेवारी २०१७

* मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात व साध्या डोळ्यास न दिसणारा [मेसेंटरी] हा एक स्वतंत्र अवयव असल्याचे वैज्ञानिकांनी चार वर्षाच्या संशोधनानंतर जाहीर केले आहे. अशा प्रकारे स्वतंत्रपणे गणल्या जाणाऱ्या द्यात मानवी अवयवांची संख्या ७९ वर पोहोचली आहे.

* लॅन्सेट या प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनाची सत्यता वैज्ञानिकच आपसात तपासून प्रमाणित करीत असल्याचे मेसेन्टसी चे स्वतंत्र अवयव म्हणून अस्तित्व अधिकृत जाहीर झाल्याचे मानले गेले आहे.

* या संशोधनाचे महत्व आणि भावी दिशा विशद करताना - पोटच्या कोणत्या ना कोणत्या विकाराशी मेसेन्टसी चा थेट संबंध असणार हे नक्की. आता आपण त्याचे शरीरातील स्थान व रचना नक्की केली आहे. त्याचे कार्य शोधणे हे पुढचे पाऊल आहे.

* एकदा नेमके कार्य कळले की त्या कार्यातील बिघाडही ओघानेच कळेल. मग त्यातून या बिघाडामुळे होणाऱ्या आजाराचे ज्ञान होईल. या सर्वांचा समुच्चय केला की मेसेन्टेरिक सायन्स चे नवे दालन अभ्यासासाठी खुले होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.