रविवार, २९ जानेवारी, २०१७

नागपूरच्या सैला कर्मा नृत्याला दुसरे पारितोषिक - ३० जानेवारी २०१७

नागपूरच्या सैला कर्मा नृत्याला दुसरे पारितोषिक - ३० जानेवारी २०१७

* दिल्ली येथील राजपथावर झालेल्या गणराज्य दिनाच्या परेडमध्ये नागपुरातील १६० विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या [सैला कर्मा] या नृत्याला प्रोत्साहनपर दुसरे बक्षीस प्राप्त झाले आहे.

* यावेळी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ पियुषकुमार गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त नृत्याचे प्रशिक्षक डिंडोरो मध्यप्रदेश जिल्ह्यातील आदिवासी कलाकार सुकलसिंह धुर्वे हे आहेत.

* २०००, २००४, २००५ आणि २००७ या वर्षी नागपूरच्या चमूला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. २००१, २००३, २००८ या वर्षी द्वितीय आणि मागील वर्षी २०१६ मध्ये पुन्हा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. देशातील ७ केंद्रांपैकी सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारे नागपूरचे केंद्र ठरले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.