शनिवार, ७ जानेवारी, २०१७

२०१६-१७ च्या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ७.१ असेल केंद्रीय सांख्यिकी कार्यालय - ८ जानेवारी २०१७

२०१६-१७ च्या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ७.१ असेल केंद्रीय सांख्यिकी कार्यालय - ८ जानेवारी २०१७

* निश्चलीकरणामुळे देशाचा विकास दर ५ टक्क्यापर्यंत खाली येण्याची शक्यता तमाम अर्थतज्ञ यांनी केली असतानाच चालू आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय सकल उत्पादन ७.१% राहण्याचा अंदाज सरकारने म्हणजेच केंद्रीय सांख्यिकी विभागाने एका अहवालात म्हटले आहे.

* ७% पुढील विकास दरासाठी निर्मिती आणि सेवा क्षेत्र यातील घसरण कारणीभूत असेल असे अहवालात सांगितले आहे. जर २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात आर्थिक प्रगती ७.१ राहिल्यास ती प्रगती भारतासाठी सुमार ठरेल.

* २०१५-१६ चा देशाचा विकास दर ७.६% एवढा होता. निर्मिती, सेवा क्षेत्राचा प्रवास या कालावधीत कमी राहणार असला तरीही कृषी क्षेत्राची वाढ अधिक प्रमाणात म्हणजेच ४.१% दराने होईल. २०१५-१६ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ १.२% दराने होती.

* खनिकर्म क्षेत्राची वाढ ७.१% वरून यंदा १.८%, तर निर्मिती क्षेत्राची वाढ यंदा ९.३% वरून ७.४% एवढी, तसेच बांधकाम क्षेत्र ३.९% वरून २.९% एवढे असेल असे अनेक क्षेत्र यांची वाढ घसरत जाईल शिवाय कृषी क्षेत्र.

* वर्ष २०१६-१७ मध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात १०% वाढ होईल. भारताचे २०१६-१७ साठी दरडोई उत्पन्न १,०३,००७ एवढे होईल. एक लाख रुपयांपुढे गेलेल्या दरडोई उत्पन्नामुळे अधिकाधिक भारतीयांचे जीवनमान उंचावल्याने स्पष्ट होत आहे. असे केंद्रीय मुख्य सांख्यिकी विभागाचे अध्यक्ष टी. सी. ए अनंत यांनी म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.