रविवार, ८ जानेवारी, २०१७

भविष्यातील सर्व आर्थिक व्यवहार बोटांच्या ठशाच्या साहाय्याने होणार - नीती आयोग ९ जानेवारी २०१७

भविष्यातील सर्व आर्थिक व्यवहार बोटांच्या ठशाच्या साहाय्याने होणार - नीती आयोग ९ जानेवारी २०१७

* नोटबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहाराना सरकारला मोठी मदत होणार आहेत. तसेच २०२० पर्यंत देशातील सर्व प्रकराची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम, पीओएस यंत्रे कालबाह्य ठरवून केवळ बोटांच्या ठशाच्या साहाय्याने पैशाचे व्यवहार केले जाणार आहेत.

* बंगळुरू येथे चालू असलेल्या तीन दिवसांचे प्रवासी भारतीय परिषद संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात आयोजित केलेल्या [स्टार्टअप अँड इनोव्हेशन] या चर्चासत्रात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.

* कांत म्हणाले देशातील १०० कोटी नागरिकांची बोटांचे ठशे आणि डोळ्यांच्या बाहुल्याच्या नकला अशी बायोमेट्रिक माहितीचा खजिना असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.

* याचा वापर करूनच सरकारने भीम अँप आणि आधारवर आधारित व्यवहार करण्याची यंत्रणा सुरु केली आहे. सन २०२० पर्यंत भारतीयांना कोणत्याही पैशाचा व्यवहार केवळ अंगठ्याचा ठसा वापरून अवघ्या तीस सेकंदात पार पाडणे शक्य आहे.

* सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन खर्व डॉलरची आहे. यापैकी २ खर्व औपचारिक आणि १ खर्व अनौपचारिक आहे. सध्या देशातील २ ते २.५% लोक कर भारतात. औपचारिक अर्थव्यवस्था वाढून जास्तीत जास्त लोक कर यंत्रणेच्या कक्षेत आल्यास १० डॉलर खर्वची अर्थव्यवस्था गाठणे शक्य होणार. असे कांत यांनी सांगितले त्याशिवाय डिजिटल व्यहाराखेरीज तरणोपाय नाही.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.