मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

जळगावच्या निशा पाटील हिला २०१६ चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - १८ जानेवारी २०१७

जळगावच्या निशा पाटील हिला २०१६ चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - १८ जानेवारी २०१७

* पेटत्या घरातून एका चिमुकलीचा जीव वाचविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्कार गौरविण्यात येणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील निशा पाटील हिचा समावेश आहे.

* १२ मुली आणि १३ मुले अशी एकूण २५ बालकांना २०१६ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये चार बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

* या पुरस्कारात मुलांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तसेच पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षणात आर्थिक मदत दिली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.