मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

केंद्रीय अर्थसंकल्पाचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर व सर्वेक्षणातील ठळक मुद्दे - ३१ जानेवारी २०१७

केंद्रीय अर्थसंकल्पाचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर व सर्वेक्षणातील ठळक मुद्दे - ३१ जानेवारी २०१७

* केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले आहे. पुढच्या वर्षभरात देशाचा विकासदर ६.७५ ते ७.५०% राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

[ आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे ] 

* पुढील आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात वेगाने प्रगती करेल. 

* चालू आर्थिक वर्षात २०१६-१७ देशाचा विकास दर ७.१% राहण्याची शक्यता. 

* चालू आर्थिक वर्षात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जीडीपी विकास दर घटून ६.५% राहील. गतवर्षी हा दर ७.६% होता. 

* २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात सेवाक्षेत्राचा ८.९% तर औद्योगिक क्षेत्राचा विकास ५.२% ने विकास होईल. 

* चालू वित्त वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर ४.१% राहील. २०१५-१६ मध्ये हाच विकास दर १.२% होता. 

* भारताचे ट्रेड जिडीपी गुणोत्तर आता चीनपेक्षा अधिक. 

* या आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यात चालू खात्यातील वित्तीय तूट ०.३% मर्यादित राहिली. 

* आर्थिक गतिशीलता आणि सामाजिक न्यायाचा आर्थिक सर्व्हेतून पाठपुरावा 

* फर्टिलायझर्स, नागरी हवाई वाहतूक, आणि बँकिंग क्षेत्रात खाजकीकरणाची शिफारस 

* श्रम आणि कर प्रणालीत फेरबदल करण्याची शिफारस 

* नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्रात रोख रकमेच्या तुटवड्याचा परिणाम जाणवेल. 

* खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे खनिज तेलाच्या किमतीमधून अर्थव्यवस्थेला मिळणारा फायदा २०१७ ते १८ च्या आर्थिक वर्षात बंद होणार

* पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. 

* क्रूड पदार्थाच्या वाढत्या किमती देशाच्या विकासदराला मारक 

* रियल इस्टेटचे दर आणखी खाली घसरणार 

* घराच्या किमती आणखी घटणार 

* किरकोळ महागाई गेल्या तीन वर्षांपासून नियंत्रणात 

* कृषी विकास दरात समाधानकारक वाढ 

* नोटबंदीनंतर निर्माण झालेली चलन टंचाई एप्रिलनंतर पूर्णपणे संपुष्टात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.