गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

बल आणि दाब सराव प्रश्न

बल आणि दाब सराव प्रश्न

१] ज्या राशीचे आकलन होण्यासाठी परिणाम व दिशा या दोन्हीची गरज असते त्या राशीला - - - - - - म्हणतात?
१] आदिश राशी २] सदिश राशी ३] गती ४] बल

२] बल ही - - - - - राशी आहे?
१] आदिश राशी २] सदिश राशी ३] गती ४] बल

३] द्रवात बुडालेल्या वस्तूला ढकलण्याच्या बलाला - - - - - - म्हणतात?
१] बल २] प्लावी बल ३] लंबरूप बल ४] समान बल 

४] दाब मोजण्याचे एकक - - - - खालील काय आहे?
१] न्यूटन / मी२ २] पास्कल ३] न्यूटन ४] न्यूटन\किमी२

५] बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा - - - - - - खालील कशी दिसते?
१] नेहमी आभासी २] सुलटी व लहान ३] सुलटी व मोठी ४] फक्त सुलटी 

६] अंतर्गोल आरशावर - - - - - - प्रतिमा कशी दिसते?
१] नेहमी आभासी २] सुलटी व लहान ३] सुलटी व मोठी ४] आभासी व वास्तव 

७] दंतवैद्यक - - - - -- या आरशाचा उपयोग करतात?
१] बहिर्गोल २] अंतर्गोल ३] दोन्हीही 

८] गाडी आणि वाहनांचा आरसा कसा असतो?
१] बहिर्गोल २] अंतर्गोल ३] दोन्हीही 

९] खालील हा चुंबकीय पदार्थ नाही?
१] लोह २] कोबाल्ट ३] निकेल ४] तांबे 

१०] विभवांतर व विद्युतदाब या एककात मोजतात?
१] व्होल्ट २] अम्पियर ३] न्यूटन ४] पास्कल


उत्तरे - १] २, २] २, ३] २, ४] १ ५] २, ६] ४, ७] १, ८] २, ९] ४, १०] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.