सोमवार, १६ जानेवारी, २०१७

जळगावच्या केळीला जीआय मानांकन - १६ जानेवारी २०१७

जळगावच्या केळीला जीआय मानांकन - १६ जानेवारी २०१७

* देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६% आहे, पण भोगोलिक उपदर्शन [ अर्थात GI - जिऑग्राफिकल इंडिकेशन ] नसल्याने या केळीची वाताहत झाली.

* ही बाब लक्षात घेता जळगावच्या केळीला युरोप, आखाती देश राष्ट्रांची दारे खुली व्हावीत यासाठी तब्बल साडेतीन वर्षे अथक परिश्रमांनंतर जळगावच्या केळीला जीआय मानांकन मिळाले. केळीप्रमाणेच भारताच्या वांग्याला सुद्धा जीआय मानांकन मिळाले आहे.

* काय आहे जीआय कायदा - ९५% आंतरराष्ट्रीय व्यापार हा जागतिक व्यापार संघटनेच्या देखरेखीत होतो. या संघटनेने उत्पादनाच्या निर्यातीसाठी जीआय कायदा आणला. देशात २००१ मध्ये तो स्वीकारण्यात आला. या कायद्याअंतर्गत चार करारानंतर जीआय मानांकन असलेल्या संस्थांना निर्यातीसाठी महत्व देण्यात येते.

* जळगावची केळी आणि भारताची वांगी याला जीआय मानांकन मिळाले म्हणून निर्यातीसाठी चालना मिळेल. यामुळे आखाती, युरोप, आशियाई आदी १६० देशामध्ये केळी व वांग्याची निर्यात करता येईल.

* राज्यात आज फक्त २२ कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. त्यात फक्त जळगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन उत्पादनांचा समावेश आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.