गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन - ६ जानेवारी २०१७

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन - ६ जानेवारी २०१७

* ज्येष्ठ अभिनय कौशल्य असलेले चित्रपट सृष्टीतील जबरदस्त व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले ओम पुरी यांचे वयाच्या ६६ वर्षी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

* जबरदस्त संवादफेक, भारदस्त आवाज, आणि अभिनयातील अलौकिक लकब यामुळे ओम पुरी यांनी भारतीय सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले होते.

* ओम पुरी यांचा जन्म १८ ऑकटोम्बर १९५० मध्ये हरियाणात झाला. प्राथमिक शिक्षण पंजाबच्या पटियालामधून केले.

* १९७६ साली पुण्यातील एफटीआयमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपले स्वतःचे थिएटर ग्रुप मजमाची स्थापना केली.

* ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकिर्दीची सुरवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा [ घाशीराम कोतवाल ] पासून सुरवात केली होती.

* १९८० साली आलेल्या [ आक्रोश ] या सिनेमानं त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली. आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका अत्यंत गाजली होती.

* अर्धसत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, दिल्ली ६, मालामाल विकली, डॉन, रंग दे बसंती, दिवाने हुए पागल, क्यू हो गया ना, काश आप हमारे होते, प्यार दिवाना होता है, या सिनेमात त्यांनी खास भूमिका साकारल्या.

* त्यांनी १२४ सिनेमात काम केले आहे व त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.