मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

वरिष्ठ पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - २५ जानेवारी २०१७

वरिष्ठ पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - २५ जानेवारी २०१७

* ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना किमान १० वर्षे ८% या निश्चित दराने व्याजदरावर आधारित पेन्शनची हमी देणारी वरिष्ठ पेन्शन योजना यंदाच्या वर्षी सुरु करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली.

* समाजातील दुर्बल वर्गाना आर्थिक प्रगतीत सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे.

* मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार वरिष्ठ पेन्शन बिमा योजना २०१७ नावाची योजना सुरु झाल्यापासून सदस्य नोंदणी सुरु राहील.

* आयुर्विमा महामंडळास या योजनेत जमा होणारा निधी गुंतवून त्यावर मिळणारा परतावा ८% हुन कमी असला, तर फरकाची एकूण रक्कम केंद्र सरकार महामंडळा
स दरवर्षी अनुदान म्हणून देईल.

* अशाप्रकारे योजनेच्या सदस्यांना किमान १० वर्षे ८% दराने व्याजदरावर आधारित ठराविक पेन्शन मिळत राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.