सोमवार, ९ जानेवारी, २०१७

कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी - १० जानेवारी २०१७

कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी - १० जानेवारी २०१७

* ई - कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य अधिकारी CEO म्हणून बिन्नी बन्सल यांच्या जागी नियुक्ती करण्या
त आली.

* तर बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सीईओ बनवण्यात आले. व्यवस्थापनेतील पुनर्रचनेत हे बदल करण्यात आले.

* जून २०१६ मध्ये टायगर ग्लोबल सोडून कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्ट मध्ये आले. वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. टायगर ग्लोब फ्लिपकार्ट मधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे.

* गेल्या वर्षीही फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनात बदल करण्यात आले होते. सचिन बन्सल यांच्या जागी बिन्नी बन्सल यांना सीईओ बनवण्यात आले. कार्यकारी अध्यक्ष पदांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून सचिन बन्सल हेच पदभार सांभाळतील.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.