बुधवार, ४ जानेवारी, २०१७

एसटी महामंडळमध्ये १४ हजार २४७ पदांची मोठी भरती - ५ जानेवारी २०१७

एसटी महामंडळमध्ये १४ हजार २४७ पदांची मोठी भरती - ५ जानेवारी २०१७

* एसटी महामंडळ रिक्त जागांचा आढावा घेतल्यानंतर १४,२४७ पदे भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामध्ये सर्वात जास्त कोकण विभागासाठी सर्वाधिक ७,९२३ चालक व वाहकाच्या पदाची भरती केली जाणार आहे.

* चालक वाहकाच्या भरतीसोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५४८ लिपिक, ३ हजार २९३ सहायक व ४८३ पर्यवेक्षकाची भरती करण्यात येईल. भरतीची जाहिरात ७ जानेवारी एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्द होणार आहे.

* अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी असेल अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. 

* २०१४ मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर २ वर्षात एकही जागा महामंडळात भरण्यात आली नव्हती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. असे सूचना व परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.