सोमवार, २३ जानेवारी, २०१७

देशांतर्गत उड्डाणामध्ये भारताने चीनला टाकले मागे - २३ जानेवारी २०१७

देशांतर्गत उड्डाणामध्ये भारताने चीनला टाकले मागे - २३ जानेवारी २०१७

* भारताने देशांतर्गत उड्डाणामध्ये भारताने चीनला खूपच मागे टाकले आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनचा देशांतर्गत उड्डाणाचा वृद्धी दर १४.९% राहिला तर भारताचा २२.३% राहिला आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने हा अहवाल जाहीर केला आहे.

* जागतीक स्तरावर देशांतर्गत उड्डाणाचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १५.३% वाटा अमेरिकेतील आहे. हा दर चीनमध्ये ८.३ आहे. भारतात १.१% तर आस्ट्रेलियात १% आहे.

* भारतात रेल्वेची सर्ज प्रायसिंग व्यवस्था देखील उड्डाणात वृद्धीचे कारण असू शकते. राजधानी, शताब्दी, दुरंतो एक्स्प्रेसमध्ये जागा आरक्षित झाल्यानंतर १०% वाढ होत जाते. अशावेळी लोक विमान प्रवासाकडे वळत आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.