शनिवार, २८ जानेवारी, २०१७

देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांकडे आधारकार्ड - २९ जानेवारी २०१७

देशात आतापर्यंत १११ कोटी लोकांकडे आधारकार्ड - २९ जानेवारी २०१७

* भारतातील १८ वर्षाखालील ९९% लोकांकडे आधार कार्ड असल्याचे स्पष्ट झाले आहेत. देशातील तब्बल १११ कोटी लोकांकडे आधारकार्ड असल्यामुळे आता सरकारच्या कॅशलेस अभियानाला गती मिळण्याची शक्यता आहे.

* आधार कार्डाच्या नोंदणीच्या या वाढलेल्या प्रमाणाविषयी बोलताना रविशंकर म्हणाले कि नोटबंदी आणि सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानामुळे कॅशलेस व्यवहारासाठी आधार कार्ड ही महत्वाची गरज बनली आहे.

* आधारप्रणीत ऍपमुळे ग्राहकांना कार्ड, पिन नंबर, पासवर्ड कशाचीच गरज उरली नसून केवळ अंगठ्याचा ठसा उमटून व्यवहार करता येणे शक्य झाले आहे.

* याशिवाय भीम ऍप हे सरकारी ऍप्लिकेशनदेखील आधार कार्डशी जोडण्यात आल्याने अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने व्यवहार करता येणे शक्य झाल्याने रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

* आतापर्यंत आधारप्रणीत ईपीएस प्रणालीशी ११९ बँका जोडल्या गेल्या असून या माध्यमातून ३३.८७ कोटींचे व्यवहार झाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.