शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

अभिनव बिंद्रा यांची टॉप समितीच्या प्रमुखपदी निवड - २८ जानेवारी २०१७

अभिनव बिंद्रा यांची टॉप समितीच्या प्रमुखपदी निवड - २८ जानेवारी २०१७

* बीजिंग ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट ऑलिम्पिक पोडियम [टॉप] समितीच्या प्रमुखपदी शुक्रवारी निवड झाली.

* पी टी उषा आणि प्रकाश पदुकोण यांचा देखील या समितीत समावेश आहे. १० सदस्य समितीत नेमबाज अंजली भागवत, सिडनी ऑलिम्पिक कांस्य विजेता कर्णम मल्लेश्वरी यांचा तसेच टेनिस महासंघाचे अध्यक्ष सी के खन्ना, बॉक्सिंगमधील प्रशासक के मुरलीधरन राजा इत्यादीचा समावेश आहे.

* ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वतः निश्चित करेल. गरज भासल्यास तद्यांना प्राचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.

* २०२० आणि २०२४ च्या ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांचा शोध घेणे हा आहे. हि योजना आधी २०१६ आणि २०२० च्या ऑलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.