सोमवार, २ जानेवारी, २०१७

वसंत डहाके यांची चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड - ३ जानेवारी २०१७

वसंत डहाके यांची चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड - ३ जानेवारी २०१७

* राज्यातील चौथ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली आहे. अकोला येथे २८ व २९ जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनासाठी साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली होती. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे ही जबाबदारी वसंत डहाके यांच्यावर सोपविण्यात आली.

* यावर्षी अकोला येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी या संमेलनाचे उदघाटन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच डॉ अभय पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या उद्देशाने चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय संमेलन उभारण्यात येते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.