मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी व केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार - ४ जानेवारी २०१७

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी व केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार - ४ जानेवारी २०१७

* संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरु होत पहिले सत्र ९ फेब्रुवारीपर्यंत चालेल व केंद्रीय अर्थसंकल्प व त्याला जोडूनच रेल्वे अर्थसंकल्पही सादर होईल. त्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणही उभय सभागृहात सादर केले जाईल.

* प्रथमच २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून, गेल्यावर्षीय स्वतंत्रपणे सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्पही यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग असेल.

* नवे आर्थिक वर्ष सुरु होताना, अर्थसंकल्पविषयक सर्व प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात व केंद्रीय योजनांसाठी १ एप्रिलपासून निधी उपलब्द व्हावा, यासाठी असे केले जाणार आहे.

* जिएसटी कौन्सिलची दोन दिवसाची बैठक सुरु झाली असून ती बुधवारपर्यंत चालेल. आणि जिएसटी लागू करण्याची प्रक्रिया सुरु होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.