सोमवार, १६ जानेवारी, २०१७

राज्यातील १३ बसस्थानक आधुनिक होणार - १७ जानेवारी २०१७

राज्यातील १३ बसस्थानक आधुनिक होणार - १७ जानेवारी २०१७
* राज्यात एसटी बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 'बसपोर्ट' ची उभारणी करण्यात येणार आहेत. एकूण १३ बसपोर्ट तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ९ बसपोर्टचा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. 

* राज्य शासनाने विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक व्यापारी संकुल, स्कायवॉक, शॉपिंग सेंटर, मिनी थिएटर इत्यादींचा समावेश असणार आहे. सार्वजनिक - खाजगी भागीदारीतुन त्याची उभारणी करण्यात येणार आहे. 

* राज्यात पहिल्या टप्प्यात बोरिवली नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजी नगर पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर आणि अकोला शहरातील बसस्थानक यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सांगली, धुळे, जळगाव, कोल्हापूर या शहरातील बसस्थानकाचा समावेश असेल. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.