गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

भारताचा आर्थिक वृद्धी दर ७% राहील - जागतिक बँक १२ जानेवारी २०१७

                                                                                    भारताचा आर्थिक वृद्धी दर ७% राहील - जागतिक बँक १२ जानेवारी २०१७
* नोटबंदीमुळे जागतिक बँकेचा आर्थिक वृद्धीदर अंदाज घटवून ७% करण्यात आला. आधी तो ७.६% होता. येणाऱ्या वर्षात भारताची वृद्धी दर पुन्हा गतिमान होऊन ७.६% ते ७.८% असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. 

* जागतिक बँकेच्या मते भारताने गतिमान वृद्धिदराच्या बाबतीत चीनला मागे टाकून जागतिक पातळीवर प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. जागतिक बँकेला आशा आहे की २०१७-१८ मध्ये भारताचा वृद्धिदर गतिमान होऊन ७.६% ते ७.८% होईल. 

* अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर २.७% राहणार आहे. असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. २०१६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा आर्थिक वृद्धी दर २.३ एवढा होता. 

* भारताबाबत जागतिक बँकेने सांगितले आहे की भारतात पायाभूत क्षेत्रातील खर्च वाढल्यामुळे व्यवसायाचे वातावरण सुधारेल नजीकच्या भविष्यात गुंतवणूक वाढण्यास त्यामुळे मदत होईल. मेक इन इंडिया अभियानामुळे देशातील वस्तू उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी मदत होईल. 

* यंदा झालेला उत्तम पाऊस आणि त्यामुळे चांगले कृषी उत्पादन याचा लाभही अर्थव्यवस्थेला मिळेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.