रविवार, १ जानेवारी, २०१७

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नववर्षाच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - १ जानेवारी २०१७

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नववर्षाच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - १ जानेवारी २०१७

* देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गीय, शेतकरी, छोटे व्यापारी आणि उद्योजक ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काही योजनांची घोषणा केली. 

[शेतकऱ्यांसाठी कर्ज सवलती] 

* शेतकऱ्यांना आणखी कर्जे उपलब्द व्हावीत यासाठी नाबार्डला आणखी २० हजार कोटी रुपयाचा निधी. 

* शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज देण्याने नाबार्ड हा होणारा तोटा सहन भरून देणार. 

* देशभरातील शेतकऱ्यांनी दिलेली सर्व तीन कोटी किसान क्रेडिट कार्ड रूपे कार्डशी परावर्तित करणार. यामुळे शेतकरी पैसे काढण्यासाठी बँकेत न जाताही शेतकरी खरेदी व्यवहार करू शकतील. 

[छोटे व्यापारी व उद्योजक] 

* छोटे व्यापारी व उद्योजक दोन कोटी रुपयांपर्यंत कर्जाला सरकारची हमी. 

* बँकांखेरीज अन्य वित्तीय संस्थांच्या कर्जालाही ही हमी लागू. 

* कॅशलेस क्रेडिट लिमिट २०% वाढवून २५% होणार. 

* डिजिटल माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारासाठी वर्किंग कॅपिटल लोनची मर्यादा २०% हुन २५% वर केली. 

* दोन कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना आठ ऐवजी सहा टक्के नफा गृहीत धरून त्यावर प्राप्तिकर आकारणी. 

[ मुद्रा योजना ] 

* मुद्रा योजनेत कर्जसाहाय्यित दलित, आदिवासी, मागासवर्गीय व महिलांना प्राधान्य यासाठी उपल्बध असलेल्या निधीत दुप्पट वाढ. 

[ ज्येष्ठ नागरिकांसाठी ] 

* ७.५ लाख रुपयाच्या ठेवीवर १० वर्षे ८% व्याज मिळेल याची हमी. यामुळे व्याजदर कमी होण्याने अडचणी दूर होतील. 

[ गरीब व मध्यमवर्गीयांसाठी घरे ]

* प्रधानमंत्री आवास योजनेत शहरामधील घरासाठी ९ लाख रुपयांपर्यंत गृहकर्जावर ४% सूट.

* १२ लाख रुपयांपर्यंत गृहकर्जावर ३% ची सूट.

* प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत ३३% जादा घरांची बांधणी.

* ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचे घर बांधणे किंवा घराचा विस्तार करण्यासाठी २ लाखापर्यंतच्या कर्जाच्या व्याजात ३% अनुदान.

* शेतकऱ्यांची जिल्हा सहकारी बँका व प्राथमिक सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे ६० दिवसांचे व्याज भरणार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.