रविवार, १ जानेवारी, २०१७

इंटरनेट ऑफ बर्ड्स हे नवीन तंत्रज्ञान विकसित - १ जानेवारी २०१७

इंटरनेट ऑफ बर्ड्स हे नवीन तंत्रज्ञान विकसित - १ जानेवारी २०१७

* BNHS - (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) आणि एक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची प्रजाती ओळखण्यासाठी [इंटरनेट ऑफ बर्ड्स] हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले.

* पक्षी निरीक्षकानी कॅमेरात टिपलेली पक्ष्यांची प्रतिमा या सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर लगेच त्या पक्ष्यांची प्रजाती आणि माहिती समोर येते. पक्षी निरीक्षणात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या पक्षी निरीक्षकासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेली ही अनोखी भेट आहे.

* इंटरनेट ऑफ बर्ड्स हे तंत्रज्ञान कुणीही केव्हाही वापरू शकतो आणि ते निःशुल्क आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षण यात नागरिकांचा भाग वाढेल तसेच व निसर्ग संवर्धनातील
नागरिकांचा सहभाग वाढेल.

* पक्षी हे पर्यावरणाचे उत्तम सूचक आहेत. ते कोठे व केव्हा आढळतात यावरून पर्यावरणाची माहिती मिळते. या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतातील नवीन पक्षी निरीक्षकाच्या संख्येत वाढ होणार आहे. असे डॉ दीपक आपटे संचालक बीएनएसएच यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.