रविवार, १ जानेवारी, २०१७

अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू BJP पार्टीत सामील - १ जानेवारी २०१७

अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू BJP पार्टीत सामील - १ जानेवारी २०१७

* मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी [ पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश - PPA ] या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल प्रदेश मध्ये सत्तांतर झाले. अशा प्रकारच्या माध्यमातून सत्तांतर होणारे ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वतःचे सरकार आणण्यात यश आले.

* अरुणाचल प्रदेश मध्ये चालू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. सत्ताधारी पीपीए पक्षाने पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून मुख्यमंत्री खंडू यांना व १४ आमदारांना पक्षातून निलंबित केले.

* तर मुख्यमंत्री खंडू यांनी यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने औपचारिक पत्र विधानसभा अध्यक्षांनी दिले व पीपीए मधील संघर्षांला पूर्णविराम दिला.

* मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षही भाजपवासी झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० पैकी ४७ असे दणकट बहु
मत भाजपाला प्राप्त झाले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.