बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

विरल आचार्य RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर - २९ डिसेंबर २०१६

                                                                                   विरल आचार्य RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर - २९ डिसेंबर २०१६
* केंद्र सरकारने विरल आचार्य यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. विरल आचार्य हे अमेरिकेतील स्टर्न विद्यापिठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. 

* उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नर पद रिक्त होते. या पदावर विरल आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली. विश्वनाथन, एस एस मुंद्रा, आर गांधी, ह्या इतर डेप्युटी गव्हर्नर आहेत. 

* आचार्य हे राजन यांच्याप्रमाणेच शैक्षणिक पार्श्वभूमीतून आले आहेत. ते न्यूयॉर्कच्या स्टर्न स्कुल ऑफ बिझनेस येथे २००८ पासून प्रोफेसर या पदावर आहेत. 

* नुकताच त्यांना आर्थिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बँकाच्या एनपीएबाबत त्यांच्या विशेष अभ्यास असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या मते जिएसटी विधेयक हा एक सकारात्मक निर्णय असल्याचे म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.