मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

११७ व्या मूलद्रव्याचे टेनेसीन असे नामकरण - IUPAC २१ डिसेंबर २०१६

११७ व्या मूलद्रव्याचे टेनेसीन असे नामकरण - IUPAC २१ डिसेंबर २०१६

* सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजाड अशा ११७ व्या मूलद्रव्याचे टेनेसीन असे नामकरण करण्यात आले आहे.

* नव्याने शोध लागलेल्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री अर्थात [IUPAC] या संस्थेने तब्बल एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर टेनेसीन या नावावर शिक्कामोर्तब केले.

* टेनेसीनचा शोध एप्रिल २०१० मध्ये लागला. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरित्या ते आढळत नाही. विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पाडल्यास संश्लेषण होते.

* त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रक एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार करते. टेनेसीनच्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य ११७ तयार होण्यास बर्कलियम २४९ हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे.

* या मूलद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी टेनेसी या अमेरिकेतील राज्याचा सिंहाचा
वाटा असल्याने मूलद्रव्याच्या या राज्याच्या नावावरून टेनेसीन हे नाव देण्यात आले आहे.

* हे हॅलोजन प्रकारातील मूलद्रव्य असल्याने टेनेसी शब्दाच्या अखेरीस जोड देऊन टेनेसीन हे नाव तयार झाले. हे मूलद्रव्य आवर्तसारणीत [TS] या नावाने ते दर्शविले जाणार आहेत.

[ असे तयार झाले टेनेसीन मूलद्रव्य ]

* अमेरिकेच्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत २२ मिलिग्रॅम बर्केलियम निर्माण करून ते रशियामध्ये पाठविले. रशियातील संशोधनांमध्ये संस्थेमध्ये प्रक्रिया करून ११७ मूलद्रव्य तयार करण्यात आले.

* तब्बल सहा महिने कॅल्शियम ४८ चा त्याच्यावर अविरत मारा केल्यानंतर कॅल्शियम आणि बर्केलियमचे केंद्रके होऊन ११७ व्या मूलद्रव्याचे सहा अणू तयार झाल्याचे शास्त्रज्ञाना दिसून आले.

* आवर्तसारणीमध्ये नोंद नसलेले मूलद्रव्य असू शकतात. या चिकित्सक वृत्तीतून जगभरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या संशोधनाचा हा परिणाम आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.