गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

रविचंद्रन अश्विन सर्वोत्कृष्ट खेळाडू - ICC २३ डिसेंबर २०१६

रविचंद्रन अश्विन सर्वोत्कृष्ट खेळाडू - ICC २३ डिसेंबर २०१६

* भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने [ICC] सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे.

* याशिवाय कसोटीमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही त्याची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक डिकॉक वन डे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.

* अश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात आले. ही ट्रॉफी जिंकणारा तो तिसरा भारतीय आणि जगात १२ वा खेळाडू ठरला आहे.

* आयसीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात.

* दुसरीकडे आयसीसी वन डे संघात विराट कोहली याला कर्णधार पद मिळाले आहे. पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिस्बा उल हक याला स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार देण्यात आला.

* वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याला टी-२० परफॉर्मर्स ऑफ दि इयर आणि बांगलादेशचा मुस्तीफर रहमान याला युवा प्रतिभावान खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

* सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मरेइस इरॅसमस यांची निवड केली गेली. आयसीसी सहयोगी देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद ठरला.

* महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-२० खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्स यांची निवड करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.