शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

५G नेटवर्क सुरु करण्याची सरकारची तयारी - ३१ डिसेंबर २०१६

                                                                                 ५G नेटवर्क सुरु करण्याची सरकारची तयारी - ३१ डिसेंबर २०१६
* मोबाइलधारकांसाठी येणारा काळ सुसाट असणार आहे. मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना २०१७ मध्ये ५G नेटवर्कची भेट मिळण्याची शक्यता आहे. देश आणि जगातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी ही सेवा सुरु करण्याची चाचपणी सुरु केली आहे. 

* नवीन वर्षात देशात ५G नेटवर्क सुरु करण्याची सरकारने तयारी केली आहे. ५G नेटवर्क साठी आवश्यक मापदंड आणि नियमावलीनुसार केलेल्या विचार विनिमयासंबंधी दस्तऐवज दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने सुरु केले आहे. 

* ५G नेटवर्कच्या माध्यमातून ओव्हरलोड डेटा फाईल्ससह डिजिटल चित्रपटही कोणत्याही मर्यादेशीवाय काही सेकंदात डाउनलोड करता येईल. थ्रीडी चित्रपट, गेम्स, अल्ट्रा एचडी मजकूर आणि रिमोट मेडिकल सेवेचा आनंद ५G नेटवर्कचे ग्राहक घेऊ शकतात. 

* ५G नेटवर्क साठी ७०० मेगाहसर्ट्स स्पेक्ट्रम पूरक असणार आहे असे ट्रायचे म्हणणे आहे. जगातील अनेक देशामध्ये ५G नेटवर्क च्या बाबतीत परीक्षण सुरु असल्याचे ट्रायचे संचालक आर एस शर्मा यांनी सांगितले आहे. 

* त्यात जगातील तंत्रज्ञानातील मोठ्या कंपन्या जसे एरिक्सन, एबी, ऑरेंज एसए, वेरिझोन कम्युनिकेशन, गुगल, सॅमसंग अशा कंपन्या असणार आहेत. 

* ५G नेटवर्क ही पुढील पिढीची यंत्रणा आहे. त्यामुळेच इंटरनेटचा वेग आणखी चांगला होणार आहे. ४ G च्या तुलनेत या नेटवर्कचा वेग १०० पट अधिक असणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.