मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

भारत इंटरनेट स्पिडच्या बाबतीत ११४ व्या स्थानावर - १४ डिसेंबर

भारत इंटरनेट स्पिडच्या बाबतीत ११४ व्या स्थानावर - १४ डिसेंबर

* भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या २०१६ च्या अखेरपर्यंत २० कोटी जाण्याची संख्या आहे. परंतु अकामाईच्या रिपोर्टनुसार भारताचा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतिक स्तरावर पहिल्या शंभर देशाच्या यादीतही क्रमांक लागत नाही.

* भारत आणि फिलिपाइन्स बेसिक इंटरनेटच्या सरासरी स्पीडच्या यादीत सर्वात खाली म्हणजे ३.५ mbps सह ११४ व्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक सरासरी इंटरनेट स्पीड असणारा देश दक्षिण कोरिया आहे. इथे २९ mbps एवढं सरासरी इंटरनेट स्पीड आहे.

* मोबाईलवर जगात सर्वाधिक जलद इंटरनेट इंग्लंडमध्ये आहे. इथे २७ mbps या वेगाने मोबाईलवर सर्फिंग केली जाऊ शकते. तर भारतात मोबाईल इंटरनेट स्पीडची सरासरी ३.२ mbps एवढी आहे.

* जगातील देशनिहाय इंटरनेट स्पीड अनुक्रमे देश - दक्षिण कोरिया २९ mbps, नॉर्वे २१.३ mbps, स्वीडन २०.६ mbps, हॉंगकॉंग १९.९mbps, स्वित्झर्लंड १८.७ mbps, [भारत ३.५ mbps ११४ व्या क्रमांकावर].  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.