शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

कॅशलेस सुविधेसाठी सरकारचे आधार अँप - २५ डिसेंबर २०१६

कॅशलेस सुविधेसाठी सरकारचे आधार अँप - २५ डिसेंबर २०१६

* काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी नोटबंदीचा कठोर निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस सुविधेसाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी २५ डिसेम्बरला [ आधार अँप ] चे अनावरण होणार आहे.

* याच पार्श्ववभूमीवर सरकार आता नवीन अँपला परवानगी दिली आहे. कॅशलेस सुविधा सेवा सुलभ करण्याच्या हेतूने आधार अँपची ओळख करून देणार आहे.

* या ऍपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कॅशलेस सेवेचा मार्गही सुलभ होण्यास मदत होईल. हे अँप अँड्रॉइड मोबाईलवर उपलब्द करून देणार आहेत. याला स्मार्टफोनच्या माध्यमातून बायोमेट्रिक रीडरने संलग्नित करावे लागणार. हा रीडर केवळ २००० रुपयांना उपलब्द करून देण्यात येणार आहे.

* या अँपद्वारे ग्राहक आपल्या आधार कार्डच्या नंबरद्वारे व्यवहार करू शकतात. आधार कार्डच्या नंबरनुसार आपल्या बँकेची निवड करावी. बायोमेट्रिक स्कॅनर पासवर्डचे काम करेल.

* युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया [UIDAI] चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले की सध्या देशातील ४० कोटी लोकांनी आधारकार्ड बँकेशी संलग्नित केले आहे. मार्च २०१७ पर्यंत सर्व आधार नंबर बँकेशी संलग्नित करण्याचे काम चालू आहे.

* कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी IDFC बँक आणि नॅशनल पेमेंट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या हे अँप विकसित केले आहे.

* या अँपमुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशी कोणतीही व्यक्ती या अँपच्या माध्यमातून व्यवहार करू शकते. मोबाईल नंबर, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.