बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार - २२ डिसेंबर २०१६

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार - २२ डिसेंबर २०१६

* मराठी विश्वातील परभणीचे प्रसिद्ध लेखक तसेच ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांना साहित्य विश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

* मराठी साहित्य विश्वातील साहित्य अकादमी हा पुरस्कार त्यांच्या अलोक या संग्रहाला जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण २२ फेब्रुवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये असे आहे.

* अलोक कथा संग्रहातून त्यांनी समकालीन ग्रामीण जगणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते आपल्या आजूबाजूचे जे भीषण वास्तव आहे ते साहित्यात मांडणे गरजेचे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.