मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात प्रथम - १४ डिसेंबर २०१६

                                                                                    महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात प्रथम - १४ डिसेंबर २०१६
* केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारीस असलेल्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याकडून [DIPP] एफडीआय च्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला जातो. 

* DIPP ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. एकेकाळी  गुजरात तामिळनाडू आणि दिल्ली महाराष्ट्र स्पर्धा असायची. 

* २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रात एकूण ६२ हजार ७६१ कोटी रुपये एफडीआयतून आले. याउलट मागील सहा महिन्यात तब्बल ६८ हजार ४०९ कोटीची थेट परकीय गुंतवणूक झाली. 

* गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली या स्पर्धक राज्यांच्या ढिसाळ कामगिरीने तर महाराष्ट्राचा झपाटा अधिकच उठून दिसतो. हि गुंतवणूक फक्त समभागातील इक्वीटी आहे. 

* महाराष्ट्रात एफडीआय प्रामुख्याने वित्तीय सेवा, तंत्रज्ञानाधिरीत सेवा, दूरसंचार, संगणक, व्यापार, वाहन उद्योगात झाली. 

* २०१५-१६ मध्ये एफडीआय प्राप्त अनुक्रमे राज्ये - महाराष्ट्र ६२७७१, दिल्ली ८३२८८, तामिळनाडू २९७८१, कर्नाटक २६७७१, आंध्रप्रदेश १०३१५, गुजरात १४६६७ हजार. 

* २०१६ एप्रिल ते सप्टेंबर एफडीआय प्राप्त अनुक्रमे राज्ये -  महाराष्ट्र ६८४०९, दिल्ली २३४१५, तामिळनाडू ४१३६, कर्नाटक ७२१६, आंध्रप्रदेश ७२०४, गुजरात २४६२ हजार.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.