गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन - ३० डिसेंबर २०१६

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन - ३० डिसेंबर २०१६

* प्रवासी वाहतूक सुलभ आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने हरियाणातील गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेन धाव
णार आहे.

* ही ट्रेन रुळावरून जात असतांना दुसरी ट्रेन रुळाच्या खालील बाजूने जाऊ शकते हे कॅटरपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. तसेच १०० किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.

* विशेष म्हणजे कॅटरपिलर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचे तयार केले आहे.    यासाठी अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

* अश्विनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्पना विकसित केली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.