शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

ज्येष्ठ सहकार नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन - ३१ डिसेंबर २०१६

ज्येष्ठ सहकार नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन - ३१ डिसेंबर २०१६

* सहकार, शेती, कारखानदारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री एकनाथ उर्फ बाळासाहेब विखे पाटील यांचे त्यांच्या राहत्या घरी लोणी राहता अहमदनगर येथे निधन झाले ते ८४ वर्षाचे होते.

* त्यांनी लोणी सारख्या गावखेड्यात देशातील पहिले खाजगी तंत्रनिकेतन सुरु करून त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली.

* १९७१ साली ते पहिल्यांदा कोपरगाव मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर सलग ३५ वर्षे कोपरगाव व अहमदनगर मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. एकेकाळी इंदिरा गांधींचे विश्वासू ओळखणारे विखे पाटील यांनी १९९९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

* अटलबिहारी यांच्या काळात ते पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी ७५ हजार कोटीची तरतूद केली.

* १० एप्रिल १९३२ साली त्यांचा जन्म झाला. भारत सरकारने त्यांना २०१० साली पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या वडिलांनी प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.