बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

जिडीपीच्या बाबतीत २०२० मध्ये भारत युकेला मागे टाकेल - फोर्ब्स २२ डिसेंबर २०६

जिडीपीच्या बाबतीत २०२० मध्ये भारत युकेला मागे टाकेल - फोर्ब्स २२ डिसेंबर २०६

* फोर्ब्स या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार गेल्या २५ वर्षात भारताने जलदगतीने  आर्थिक विकास केल्याने व गेल्या वर्षभरात पौंडचे मूल्य सातत्याने घसरल्याने ही नाट्यमय कलाटणी शक्य झाली.

* गेल्या महिन्यात ब्रिटनला ब्रेक्झिट शी संबंधित समस्या सोसाव्या लागल्याने आणि भारताने वेगवान आर्थिक प्रगती केल्याने गेल्या १५० वर्षात प्रथमच सकल राष्ट्रीय उत्पन्नत जिडीपी बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेने युकेला मागे टाकले आहे.

* परिणामी वर्ष २०१६ चा युकेचा १.८७ खर्व पौंडाचा जिडीपी आजच्या विनिमय दराने [ ०.८१ पौंड = १ डॉलर ] डॉलरमध्ये सांगायचा झाल्यास २.२९ खर्व डॉलर एवढा होतो.

* याउलट याच वर्षातील भारताचे १५३ खर्व रुपयाचे जिडीपी ६६.६ रुपये = १ डॉलर या विनिमय दराने डॉलरच्या रूपात युकेपेक्षा जास्त म्हणजे २.३० खर्व डॉलर एवढे होते.

जगातील टॉप टेन अर्थव्यवस्था २०१६ [जिडीपी]

१] यूएस/अमेरिका - १८.५ ट्रिलियन डॉलर

२] चीन   - ११.३ ट्रिलियन डॉलर

३] जपान - ४.७३ ट्रिलियन डॉलर

४] जर्मनी - ३.४९ ट्रिलियन डॉलर

५] युके/ब्रिटन - २.६५ ट्रिलियन डॉलर

६] फ्रान्स - २.४८ ट्रिलियन डॉलर

७] भारत - २.२५ ट्रिलियन डॉलर

८] इटली - १.८८ ट्रिलियन डॉलर

९] ब्राझील - १.७७ ट्रिलियन डॉलर

१०] कॅनडा - १.५३ ट्रिलियन डॉलर0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.