सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

भारताकडून अग्नी - ५ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण - २६ डिसेंबर २०१६

भारताकडून अग्नी - ५ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण - २६ डिसेंबर २०१६

* भारताकडून अग्नी - ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहेत. असे डीआरडीओ - अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑर्गनायझेशनमधील सूत्रांनी सांगितले आहे.

* आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी असेल. यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येते. संपूर्ण चीन अग्नी - ५ च्या कक्षेत येणार आहे. अग्नी - ५ अणवस्त्र वाहून नेण्यातही सक्षम असणार आहे.

* संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी ५ चे ३ टप्पे आहेत. अणवस्त्र डागण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ ला अ
गदी सहजपणे कोणत्याही ठिकाणी शत्रूवर अणवस्त्र सोडले जाऊ शकते.

* याआधी २०१२, २०१३, २०१५ मध्ये अग्नी ५ ची चाचणी घेण्यात आली होती. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रांस, ब्रिटन या देशाकडे ५ हजार किलोमीटर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत.

* आता या देशात भारताचा समावेश होणार आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत हा जगातील सहावा देश असणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.