शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

राज्यातील पहिले आद्रता विरहित सौर शीतगृह [कोल्ड स्टोरेज] अकोल्यात होणार - १ जानेवारी २०१७

राज्यातील पहिले आद्रता विरहित सौर शीतगृह [कोल्ड स्टोरेज] अकोल्यात होणार - १ जानेवारी २०१७

* महाराष्ट्र राज्या
तील पहिले आद्रता विरहित सौर शीतगृह [कोल्ड स्टोरेज] अकोल्यात होणार आहे. यासाठी ३६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या [ महाबीज ] या शीतगृहाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ५०% अनुदान प्राप्त होणार आहे.

* अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत १० हजार स्क्वेअर फूट जागेवर हे शीत गोदाम होणार आहे. भाजीपाला, बियाणे सुरक्षित राहण्यासाठी आद्रता विरहित व पूरक तापमान हे शीत गोदाम होणार आहे.

* खाजगी कंपन्यांचे भाजीपाला बियाणे महागडे असून शेतकऱ्यांना परवडत नसल्याने महाबीजच्या भागधारक शेतकऱ्यांनी महाबीजने भाजीपाला निर्यात करावे यासाठीची मागणी सातत्याने केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.