बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर - ८ डिसेंबर २०१६

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर - ८ डिसेंबर २०१६

* आरबीआयच्या पतधोरण समितीने पतधोरण जाहीर केले असून व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. RBI कडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर [ रेपोरेट ] ६.२५ एवढा ठेवण्यात आला आहे. व रिव्हर्स रेपो रेट दर ५.७५% कायम ठेवण्यात आला.

* रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतो तो दर होय. म्हणजेच रेपो रेट वाढण म्हणजे RBI कडून मिळणाऱ्या कर्जदारात वाढ होण होय. रेपो रेट कमी होण म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळण म्हणजेच RBI ने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढावे लागतात. तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

* रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेट च्या अगदी उलट संकल्पना होय, बँक त्यांच्याकडे जमा असलेला जास्तीचा निधी ठेवीच्या स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. या ठेवीवर रिझर्व्ह बँकां देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट दर म्हणतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.