बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

देशात ऑनलाईन खरेदीत दिल्ली प्रथम - २९ डिसेंबर २०१६

देशात ऑनलाईन खरेदीत दिल्ली प्रथम - २९ डिसेंबर २०१६

* देशभरात ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत वर्षभरात सुमारे ५०% वाढ झाली आहे. ऑनलाईन खरेदीत दिल्लीकर आघाडीवर असून बंगळुरू व तिसऱ्या स्थानावर मुंबई या शहरातून सर्वाधिक ऑनलाईन खरेदी होत असल्याचे स्नॅपडीलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

* जानेवारी ते डिसेम्बर या कालावधीत सर्वाधिक खरेदी दिल्ली, बंगळुरू, व मुंबई या प्रमुख शहरानंतर प्रथम श्रेणीच्या शहरामध्ये पुणे शहर आघाडीवर आहे.

* वर्षभरात देशात झालेल्या ऑनलाईन खरेदीत ६०% मागणी ही द्वितीय श्रेणीच्या शहरामधून होत असून ४०% मागणी महानगरे व प्रथम श्रेणीच्या शहरामधून झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

* मोबाईल अँप वरून खरेदी करण्याचे प्रमाण वाढत असून त्याच्यावर ८२ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

* महानगरामध्ये पुरुषाच्या सौन्दर्य प्रसाधन उत्पादनाच्या मागणीत ५८% वाढली आहे. तर महिलांच्या सौन्दर्य प्रसाधनात उत्पादनाच्या मागणीत ३४५% वाढ झालेली आहे.

* या खालोखाल मोबाईल व टॅब्लेटच्या मागणीत वाढ झालेली आहे. मोबाईल आणि टॅब्लेटच्या विक्रीपैकी ३५% विक्री उत्तर भारतात झाली आहे. तर पुरुष व महिला यांच्या पारंपरिक पोशाखात सुद्धा विक्री वाढली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.