रविवार, ४ डिसेंबर, २०१६

कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी आता आधार अनिवार्य केंद्र सरकार - ५ डिसेंबर २०१६

कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी आता आधार अनिवार्य केंद्र सरकार - ५ डिसेंबर २०१६

* केंद्र सरकाराच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी आता आधार कार्डच्या साहाय्याने बँक व्यवहार करण्यात येतील. आता सर्व खाते आधार कार्डशी संलग्नित करून अधिकाधिक व्यवहार कार्डच्या साह्यायाने करता येतील.

* व्यवहारातील दोन्ही व्यक्तीची बँक खाती आधार कार्डशी जोडलेली असतील तरच १२ अंकी क्रमांकाच्या साह्यायाने ऑनलाईन व्यवहार करता येतील.

* तसेच आधार कार्डशी संलग्नित बँक खात्यातून खातेदारांना रकमा डेबिट आणि क्रेडिट करण्याचा पर्यायही उपलब्द होईल. मात्र सर्व नोंदणीपूर्व फिंगरप्रिंट्स वा रेटिना स्कॅनींग व्हेरिफिकेशन बंधनकारक असेल.

* आधार कार्ड संलग्नित बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉइड बेस मोबाईल ऍप सुरु करण्यात येणार आहे. त्या ऍप द्वारे स्कॅनींग करता येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.