मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

स्मार्ट ग्राम योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु - १३ डिसेंबर २०१६

                                                                                     स्मार्ट ग्राम योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु - १३ डिसेंबर २०१६
* १८ ऑगस्ट २०१० रोजी शासन निर्णयानुसार पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरु करण्यात आली होती. या योजनेचे रूपांतर करून स्मार्ट ग्राम योजना अशी नवीन योजना राबविण्याचा निर्णय २१ नोव्हेंबर २०१६ रोजी शासनामार्फत घेण्यात आला आहे. 

* राज्यातील सर्व भागातील सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्द होईल. अशा पद्धतीने स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. 

* स्मार्ट ग्राम योजनेत तालुका स्तरावर सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीचे ठराव संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. 

* १६ ते ३१ डिसेंबर पर्यंत प्राप्त प्रस्तावापैकी २५% ग्रामपंचायतीची यादी प्राप्त करून तालुकास्तरीय समितीकडून ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येणार आहे. तपासण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची निकषनिहाय गुणांकन यादी पंचायत समित्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 

* तालुका स्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून घोषित झालेल्या तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींना प्रजासत्ताक दिनी पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. 

[ स्मार्ट ग्राम निवडीचे निकष ]

* स्मार्ट ग्राम म्हणून ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी एकूण २५ निकष निश्चित करण्यात आले आहे. त्याआधारे ग्रामपंचायतीचे गुणांकन करण्यात येणार आहे. स्मार्ट ग्राम योजनेच्या निकषांमध्ये प्रामुख्याने वैयक्तिक शोचालाय सुविधा वापर. 

* सार्वजनिक इमारतीवरील शौचालय व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचत गट, प्लास्टिक वापर बंदी, ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली. 

* पथदिव्यांचा वीज देयकांचा भरणा, मागासवर्गीय, महिला व बालकल्याण आणि अपंगासाठी करण्यात येणारा खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन, सामाजिक दायित्व, एलईडी दिव्यांचा वापर, सौर पथदिवे, बायोगॅस सयंत्र, वृक्ष लागवड, जलसंधारण, अभिलेखांचे संगणकीकरण, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, आधार कार्ड व संगणक अद्यावलीचा वापर. 

* तसेच स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करून, या योजनेत सहभागी होणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे प्रस्ताव स्वीकरण्याचे निर्देश बिडीओना देण्यात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.