सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

केंद्र सरकारच्या उजाला योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु - २६ डिसेंबर २०१६

केंद्र सरकारच्या उजाला योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु - २६ डिसेंबर २०१६

* केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल - उजाला या योजनेअंतर्गत देशभरात सुरु झालेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेत ७ ऐवजी ९ वॅटचे बल्ब देण्याची योजना राज्यात लागू झाली.

* ९ वॅट एलईडीचे दिवे केवळ ६५ रुपयात देण्याच्या योजनेला पुण्यात सुरवात झाली. विदर्भातील सुरवात अकोला शहरातून होणार आहे.

* ईईएसएल या कंपनीने महावितरणच्या साहाय्याने महाराष्ट्रात जुलै २०१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना सुरु केली होती. या योजनेत सात वॅटचे १० लाईट प्रत्येकी ८५ रुपयांना वितरित करण्यात आले.

* महावितरण आणि ईईएसएल यांच्या वतीने प्रमुख शहरामध्ये वितरण केंद्रे उभारण्यात आली होती. आता या योजनेअंतर्गत ९ वॅटचा एलईडी दिवा केवळ ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे.

* पूर्वीच्या सात वॅट एलईडी योजनेअंतर्गत या योजनेतही वीजग्राहकास प्रत्येकी ६५ रुपयांमध्ये १० एलईडी दिवे मिळणार आहेत. यामध्ये वीजबिलातून मासिक कपातीचा पर्यायही असणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.