शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे निधन - २५ डिसेंबर २०१६

ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे निधन - २५ डिसेंबर २०१६

* व्यंगचित्राला साहित्यात महत्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरनाटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथे घरी निधन झाले.

* सरवटे यांचा जन्म १९२७ साली कोल्हापूर येथे झाला. पुण्याच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत नोकरी केली.

* परंतु व्यंगचित्राकडे त्यांचा अधिक कल होता. पु ल देशपांडे, श्री दा पानवलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रमेश मंत्री यांच्या मराठी पुस्तकावरील मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली आहे.

* खडा मारायचा झाला तर, सावधान पुढे वळण आहे, खेळ रेषावतारी, खेळ चालू राहिला पाहिजे या व्यंगचित्रातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अधिक गाजली.

* सरवटे यांना तीन संग्रहाचा राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट जीवनगौरव पुरस्कार, सह्यांद्रीचा कलारत्न, इत्यादी पुरस्काराने गौरविण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.