शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

सरबजीत व एम एस धोनी या भारतीय चित्रपटाची ऑस्करसाठी निवड - २३ डिसेंबर २०१६

सरबजीत व एम एस धोनी या भारतीय चित्रपटाची ऑस्करसाठी निवड - २३ डिसेंबर २०१६

* ऑस्करची बाहुली पटकावण्याच स्वप्न प्रत्येक फिल्ममेकर उराशी बाळगून ठेवतो. हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने भारतातर्फे दोन चित्रपटाची वाटचाल सुरु झाली आहे.

* एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि सरबजीत या दोन बायोपिक्सची निवड ऑस्करच्या दीर्घ यादीत झाली आहे. जगभरातील ३३६ चित्रपटाची निवड आतापर्यंत झाली आहे.

* नीरज पांडे दिग्दर्शित धोनी चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, दिशा पटानी, कायरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. सरबजीत चित्रपटात रणदीप हुडा, ऐश्वर्या रॉय बच्चन हे कलाकार होते.

* अकँडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी संबंधित फिचर फिल्मचे खेळ लॉस एंजेलिस या व्यवसायीक थिएटरमध्ये एक जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत किमान सलग सात दिवस व्हायला हवेत. या चित्रपटाचा कालावधी किमान ४० मिनिटाचा असणं आवश्यक आहे.

* भारतीय अमेरिकन दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या क्वीन ऑफ कातवे या चित्रपटाचा समावेशही या यादीत झाला आहे. याशिवाय ला ला लँड, मुनलाइट, मँचेस्टर बाय द सी, सायलेन्स, अरायव्हल, डेडपूल, सुसाईट स्क्वाड, कॅप्टन अमेरिका - सिव्हिल वॉर, एक्स मॅन - अपॉकसलीस या चित्रपटाचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.