बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रमंडळाची अंतिम मंजुरी - ८ डिसेंबर २०१६

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रमंडळाची अंतिम मंजुरी - ८ डिसेंबर २०१६

* दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सायंकाळी मान्यतेची अंतिम मोहोर उमटवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यात आले.

* महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत मेट्रोची उभारणी होणार असून पुणे व पिंपरी चिंचवड या शहरातील ५० लाख लोकसंख्येला त्याचा फायदा होणार आहे. मेट्रो ऍक्टनुसार १९७८, २००२, १९८९ यानुसार प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

* मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट १६.५ किमी, व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांना मंजुरी देण्यात आली या प्रकल्पासाठी एकूण ११ हजार ४२० कोटी रुपये एवढा खर्च आहे.

* या प्रकल्पाचा केंद्र व राज्यसरकार प्रत्येकी २०% वाटा उचलणार आहेत. उर्वरित ५०% निधी दोन्ही महापालिकाना कर्जातून उभा करावा लागणार आहे. यासाठी जागतिक बँक आणि एशियन बँक यांनी ६ हजार ३२५ कोटीचे कर्ज मंजूर केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.