सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

कॅशलेस व्यवहारासाठी सरकार देणार मोफत इंटरनेट - २० डिसेंबर २०१६

कॅशलेस व्यवहारासाठी सरकार देणार मोफत इंटरनेट - २० डिसेंबर २०१६

* नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी डिजिटल पेमेंट करण्यासाठी सरकार
कडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

* डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण वाढवण्यासाठी आता नागरिकांना मोफत इंटरनेट देण्याचा विचार सरकार करीत आहे.

* डिजिटल पेमेन्टचे प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामीण भागात प्रत्येक महिन्याला ठराविक मोफत डेटा देण्याची शिफारस ट्रायने केली आहे.

* ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल पेमेंट करता यावे यासाठी दरमहा १०० एमबी डेटा मोफत द्यावा असे सरकारला वाटते.

* तसेच येत्या अर्थसंकल्पात याची घोषणा होऊ शकते. तसेच यासाठी लागणारा खर्च युनिवर्सल ऑब्लिगेशन फंडातून घेण्याचेही ट्रायने सुचविले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.