सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना हटविले - २६ डिसेंबर २०१६

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना हटविले - २६ डिसेंबर २०१६

* निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना हटविले यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.

* २००५ नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ मात्र या पक्षातून घेण्यात येत आहेत.

* महाराष्ट्रातील पुढील २५ राजकीय पक्ष बाहेर पडले - १] अखिल भारतीय भारत माता - धुळे, २] अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सेना - पुणे, ३] बहुजन महासंघ पक्ष - अकोला, ४] भारतीय संताजी पार्टी - नागपूर, ५] काँग्रेस ऑफ पिपल - मुंबई, ६] लोकराज्य पार्टी मुंबई, ७] महाराष्ट्र प्रदेश क्रांतिकारी
पार्टी - सातारा, ८] महाराष्ट्र राजीव काँग्रेस मुंबई, ९] महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट मुंबई, १०] महाराष्ट्र विकास काँग्रेस - जळगाव, ११] नारीशक्ती पार्टी - मुंबई, १२] नाग विदर्भ आंदोलन समिती नागपूर, १३] नॅशनल मायनॉरिटी पार्टी (मुंबई), १४. नॅशनल रिपब्लिक पार्टी (मुंबई), १५. नेटिव्ह पीपल्स पार्टी (मुंबई), १६. नवमहाराष्ट्र विकास पार्टी (मुंबई), १७. नेताजी काँग्रेस सेना (पुणे), १८. पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग आॅफ इंडिया (नागपूर), १९. रिपब्लिक मुव्हमेंट (चंद्रपूर), २०. सचेत भारत पार्टी (मुंबई), २१. समाजवादी जनता पार्टी (महाराष्ट्र) (मुंबई), २२. दी कन्झ्युमर पार्टी आॅफ इंडिया (मुंबई), २३. विदर्भ जनता काँग्रेस (नागपूर),२४. विदर्भ राज्य मुक्ती मोर्चा (नागपूर), २५. वूमनिस्ट पार्टी इत्यादी पक्षांना काढून टाकण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.